Roshan More
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात झाला.विद्यार्थीदशेपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये भारतीय जनसंघची स्थापना केली तेव्हा अडवाणी यांना राजस्थानमधील पक्षाच्या शाखेचे सचिव करण्यात आले. 1970 पर्यंत ते या पदावर राहिले.
1973 ते 1977 पर्यंत अडवाणी हे जनसंघाचे अध्यक्षपद भूषवले. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा ते पक्षाचे संस्थापक सदस्य होते.
अडवाणी 1980 ते 1986 पर्यंत भाजपचे सरचिटणीस होते. अडवाणी यांनी तीन वेळा भाजपचे अध्यक्षपद भूषवले आहे.
अडवाणी 5 वेळा लोकसभा आणि 4 वेळा राज्यसभेचे खासदार होते. 1977 ते 1979 या काळात ते पहिल्यांदा केंद्रात मंत्री झाले. या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला.
अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातमधील सोमनाथ ते उत्तर प्रदेशातील अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली.
अटलबिहार वाजपेयी हे पंतप्रधान असताना 1999 ते 2004 या कालावधीत एनडीए सरकारच्या काळात लालकृष्ण अडवानी हे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते.
देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने अडवानी यांना सन्मानित करण्यात आले.