Pradeep Pendhare
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक आमदार मोनिका राजळे यांनी 98 हजार 630 मते मिळवत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक साधली.
मोनिका यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले असून, त्या छत्रपती संभाजीनगरमधील माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांच्या कन्या आहेत.
मोनिका राजळे यांचा राजकीय प्रवास सासरी सुरू झाला असून, 2012 मध्ये जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदीवर निवड होऊ सुरू झाला.Sarkarnama
भाजपची 2014 मध्ये लाट होती, त्यावेळी मोनिका राजळे 58 हजार मतांनी विजय होत, तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार झाल्या.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे, तथा मोनिका राजळे यांचे पती अभ्यासू लोकप्रतिनिधी राजीव राजळे यांचे 7 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले.
2019च्या विधानसभा निवडणुकीत राजळेंना स्वपक्षीयांकडूनच मोठा विरोध झाला. “राजळे हटाव, भाजप बचाव” अशी घोषणा त्यावेळी लोकप्रिय ठरली.
विरोधानंतर देखील राजळे यांना भाजपची उमेदवारी मिळाली अन् प्रतापराव ढाकणे यांचा 14 हजार 294 मतांनी पराभव केला.
यंदा 2024 च्या निवडणुकीत राजळेंना पुन्हा जोरदार विरोध अन् यावर मात करत भाजपकडून तिकीट मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली. आता मंत्रीपदाच्या चर्चेत.