Pradeep Pendhare
माहिती अधिकारी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यात गाजलेल्या 72 हजार सिंचन घोटाळा उघडकीस आणला होता.
सिंचन घोटाळा राज्यात गाजल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचा 2012 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता.
पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता.
छगन भुजबळ यांच्याविरोधात बनावट कंपन्यांमार्फत मनी लाँडरिंगचा पर्दाफाश केला. 2016 मध्ये भुजबळांना तरुंगात जावे लागले होते.
ओबीसींची आरक्षणात लढाईत असतानाच छगन भुजबळांवर मुंबई सांताक्रूझ इथलं फ्रान्सिस फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप गाजला होता.
अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्या दाऊद फोनप्रकरणी आणि पीएवरील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यात एकनाथ खडसेंनी 2016 मध्ये मंत्रिमंडळातून हाकलपट्टी झाली होती.
अंजली दमानिया आम आदमी पक्षात असताना राज्याचे नेतृत्व करत होत्या. नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नागपूरमधील निवडणूक लढवताना त्यांनी गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 'आप'मध्ये कलह सुरू होता. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी पक्ष सोडल्यानंतर अंजली दमानिया यांनी पक्षाचा राजीनामा दिला.