Jaidatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागरांची राजकीय खेळपट्टी ठरली; टीम अजूनही ठरेना!

Vijaykumar Dudhale

पंचायत समिती सदस्य ते कॅबिनेट मंत्री

जयदत्त क्षीरसागर यांनी बीड पंचायत समिती सदस्य, पाच वेळा आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले आहे.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

शरद पवारांना साथ

बीडच्या खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणारे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. राष्ट्रवादीनेही त्यांना कॅबिनेट मंत्री करत सन्मान दिला होता.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

राष्ट्रवादीत साईड लाईनला

राष्ट्रवादीत अजित पवार गट प्रबळ झाल्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे साईड लाईनला पडू लागले. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना पक्षातून बळ दिले जाऊ लागले.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

भाजपला मदत

धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर क्षीरसागर यांचे राजकीय खच्चीकरण होऊ लागले, त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या प्रतिम मुंडेंचे काम केले.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

पुतण्याकडून पराभव

जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पुढे विकासकामांच्या भूमिपूजनावरून पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

40 वर्षांची सत्ता गेली

बीड बाजार समितीच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाला आणि समितीवरील 40 वर्षांची सत्ताही गेली.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

सोनवणेंना ताकद

राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला गेलेले जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली. त्यामुळे ते मुख्य राजकीय प्रवाहात आले.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

पुतण्या-भाऊ जवळ आले

जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्यात संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर आणि त्यांचे वडिल रवींद्र क्षीरसागर यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. मात्र, योग्य वेळी योग्य निर्णय म्हणत क्षीरसागर यांनी आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.

Jaidatta Kshirsagar | Sarkarnama

उपक्रमशील 'लेडी सिंघम'

IPS Vinita Sahu | Sarkarnama