IPS Vinita Sahu : उपक्रमशील 'लेडी सिंघम'

Pradeep Pendhare

2010 च्या बॅचच्या IPS

विनिता साहू या 2010 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारे पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली.

IPS Vinita Sahu | sarkarnama

लेडी सिंघम

पोलिस अधीक्षक म्हणून विनिता साहू पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग, नांदेड, नागपूर, वाशिम, भंडारा, गोंदियामधील कामाचा मोठा अनुभव आहे. लेडी सिंघम म्हणून त्यांना ओळखले जाते.

IPS Vinita Sahu | sarkarnama

उपक्रमशीलता

भंडारामध्ये 2017 पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना मोबाईल पोलिस चौकीचा उपक्रम यशस्वी केला. महिला आणि मुलींच्या तक्रारींवर सर्वाधिक भर दिला.

IPS Vinita Sahu | sarkarnama

हेल्मेट सक्ती

विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याअगोदर विनिता साहू यांनी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना हेल्मेट सक्ती केली होती.

IPS Vinita Sahu | sarkarnama

पोलिस-दीदी

नागपूरमध्ये कार्यरत असताना 2019 मध्ये 'जागरूक मी आणि समाज' हा उपक्रम यशस्वी केला. तसेच 'पोलिस-दीदी' हा उपक्रमामुळे चर्चेत आल्या.

IPS Vinita Sahu | sarkarnama

होम ड्राॅप

पोलिस आयुक्त डाॅ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपूरमध्ये 'होम ड्राॅप' योजन सुरू केली होती. त्याची यशस्वी अंमलबजावणी विनिता साहू यांनी केली.

IPS Vinita Sahu | sarkarnama

सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्री शक्ति

सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनकडून देशातील 29 महिलांचा 'सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्री शक्ति' पुरस्काराने विनिता साहू यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

IPS Vinita Sahu | sarkarnama

बहिणी देखील अधिकारी

विनिता साहू यांची मोठी बहीण नमिता साहू मध्यप्रदेश पोलिसात आणि धाकटी बहीण खुशबू साहू सर्वोच्च न्यायालयात AOR आहे.

IPS Vinita Sahu | sarkarnama

'फेमिना'मध्ये सन्मान

विनिता साहू नेहमीच त्यांच्या कामाच्या खास शैलीसाठी ओळखल्या जातात. यामुळे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या प्रतिष्ठित 'फेमिना' मासिकाच्या एप्रिल 2021 च्या अंकात स्थान मिळवले.

IPS Vinita Sahu | sarkarnama

NEXT : एक, दोन नव्हे मोदींच्या मंत्रिमंडळात 'इतके' माजी मुख्यमंत्री

येथे क्लिक करा :