सरकारनामा ब्यूरो
गोविंदा हे अभिनेते, कॉमेडियन आणि माजी खासदार आहेत. भारतातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी ते एक आहेत.
एका सर्वेक्षणाद्वारे आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
1980 मध्ये 'इल्जाम' या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर एकामागे एक हिट चित्रपट त्यांनी दिले.
अभिनय क्षेत्रात आपली छाप टाकत त्यांनी राजकीय क्षेत्रातही काम केले आहे.
वसई येथील वर्तक कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली.
शिक्षण पूर्ण होताच ते अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला आले.
2004 मध्ये राजकारणात प्रवेश करत लोकसभा निवडणुकीत ते उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे राम नाईक यांचा पराभव करत खासदार म्हणून निवडून आले होते.
खासदार म्हणून त्यांनी वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या तिन्ही गोष्टींवर भर दिला.
एकाच वेळी दोन्ही क्षेत्रात काम करत त्यांनी अभिनय क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.