सरकारनामा ब्यूरो
डॉ. श्रीकांत जिचकार हे भारतातले एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी 42 विद्यापीठांतून 20 डिग्री मिळवल्या आहेत.
नागपूरजवळील आजमगावात त्यांचा जन्म झाला. तिथूनच त्यांचा उल्लेखनीय शैक्षणिक प्रवास सुरु केला
जिचकार यांना ज्ञान मिळवण्याची प्रचंड आवड होती. म्हणून ते कायमच नवनवीन शिक्षणाच्या शोधात असत.
वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी त्यांनी एमबीबीएस आणि एमडी पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायदा, व्यवसाय प्रशासन आणि पत्रकारितेचेही शिक्षण घेतले.
पदवीवरच न थांबता प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अतुलनीय प्रदर्शन केले. ते नेहमी प्रथम क्रमांक मिळवत त्याचबरोबर अनेक सुवर्णपदकेही त्यांनी मिळवली.
शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात कठीण IPS आणि IAS ची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी अष्टपैलुत्वाची कामगिरी केली.
नागरी सेवांमध्ये गेल्यानंतर त्यांना समजले की, खरे आवाहन राजकारणात आहे म्हणून वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी राजीनामा दिला.
राजकारणात प्रवेश करत ते भारतातील सर्वात तरुण आमदार बनले. राजकीय कुशाग्रतेने त्यांनी राज्यसभेचे खासदार यासह अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या.