New Pope Selection : नवीन पोप कोण होणार? 'दोन' खंडात लागलीय स्पर्धा, जाणून घ्या नियम व अटी

Jagdish Patil

कॅथॉलिक चर्च प्रमुख

कॅथॉलिक चर्चचे प्रमुख असलेले पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं.

Pope Francis Death | Sarkarnama

पोप फ्रान्सिस

पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता नव्या पोपची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Pope Francis Death | Sarkarnama

नव्या पोपची निवड

पोप हे पद आयुष्यभरासाठी असतं. मात्र, या पदावरील व्यक्तीचं निधन झाल्यास किंवा त्या व्यक्तीने राजीनामा दिल्यास नवीन पोप निवडला जातो.

pope francis death | Sarkarnama

पोप बेनेडिक्ट

2013 मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी राजीनामा दिला होता. पदावर असताना राजीनामा देणारे ते सहाशे वर्षांतील पहिले पोप होते.

Pope Benedict XVI | Sarkarnama

'पॅपल कॉनक्लॅव्ह'

तर कॅथॉलिक परंपरेनुसार नव्या पोपची निवड करताना 'पॅपल कॉनक्लॅव्ह'चे आयोजन केलं जातं. कार्डिनल म्हणजे कॅथॉलिक चर्चमधील सर्वोच्च पदावरील पाद्री पोपची निवड करतात.

Cardinal | Sarkarnama

कार्डिनल बैठका

कार्डिनल हे जगभरातील विशप आणि व्हॅटिकनचे अधिकारी असतात. खासगी स्तरावर त्यांची निवड पोप करतात. यासाठी कार्डिनल अनेक बैठका घेतात.

papal conclave process | Sarkarnama

2 खंडात स्पर्धा?

यावेळी आफ्रिकी किंवा आशियाई पोपची निवड होऊ शकते. यामध्ये फिलिपिन्सचे कार्डिनल लुईस अँटोनिओ तागले आणि घानाचे कार्डिनल पीटर तुर्कसन यांची नावे चर्चेत आहेत.

Catholic Church | Sarkarnama

अट

पोप या पदावर केवळ पुरुषाचीच नियुक्ती केली जाते. यासाठी वयाची कोणतीही अट नसते.

New Pope Selection | Sarkarnama

NEXT : पोप कोण होणार? हे चार भारतीय कार्डिनल्स बजावणार महत्त्वाची भूमिका

Pope Francis Dies | Sarkarnama
क्लिक करा