Manish Kashyap : बिहारमधील बहुचर्चित यूट्यूबर मनीष कश्यप भाजपामध्ये दाखल!

Mayur Ratnaparkhe

बिहारमधील चर्चित यूट्यूबर मनीष कश्यप यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

मनीष कश्यप यांनी म्हटले की, माझे विचार भाजपाशी जुळतात. त्यामुळे मी भाजपात प्रवेश करत आहे.

मनीष कश्यप यांच्या समर्थकांद्वारे अंदाज वर्तवला जात आहे की, ते आगामी काळात विधानपरिषद निवडणूक लढतील. 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.

माझी लढाई भाजपाशी नव्हतीच, कारण माझे विचार भाजपाशी चांगल्याप्रकारे जुळतात, असंही म्हटलं आहे.

मनीष कश्यप म्हणाले की, मी तुरुंगात होतो तेव्हा माझी आई झगडत होती.

माझ्या आईला माहीत आहे कोणी-कोणी मदत केली. आईने म्हटले की मनोज भैय्यांचा शब्द टाळायचा नाही.

मनीष कश्यप हे भाजपात प्रवेश करण्यासाठी त्यांच्या आईसोबत दिल्लीत दाखल केले होते.

भाजपा नेते मनोज तिवारी यांनी मनीष कश्यप यांना दिल्लीत भाजपा अध्यक्ष नड्डा यांची भेट घडवली.

Next : राहुल गांधी, हेमा मालिनी..; ‘या’ आहेत दुसऱ्या टप्प्यातील ‘हायप्रोफाइल’ लढती