Ganesh Sonawane
भारतीय पोस्ट विभागातर्फे नागरिकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये ‘ग्राम सुरक्षा योजना’ ही एक महत्त्वाची जीवन विमा योजना आहे, जी ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही एक सुरक्षित योजना आहे. या योजनेत तुम्हाला रोज फक्त 50 रुपयांची बचत करायची आहे. या योजनेतून तुम्ही 35 लाख रुपये मिळवू शकतात.
पोस्टाच्या ग्राम सुरक्षा योजनेत फक्त भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते. 19 वर्ष ते 55 वर्षे वयोगटातील नागरिकांना पोस्टाच्या ग्रामसुरक्षा योजनेत पैसा गुंतवता येतो.
या योजनेत किमान दहा हजार आणि कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते म्हणजेच दहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही आणि दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येत नाही.
ग्राम सुरक्षा योजनेत दररोज 50 रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 35 लाख रुपयांचा पूर्ण फायदा मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 80 व्या वर्षी या योजनेची ही रक्कम बोनससह मिळते.
जर याच्या गुंतवणूकदाराचा 80 व्या वर्षाच्या आधी मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला म्हणजे नामांकित व्यक्तीला ही पूर्ण रक्कम मिळते. यात मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करता येते.
जर तुम्ही 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजना खरेदी केली तर 55 वर्षांपर्यंत तुम्हाला 1515 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागणार अशी माहिती जाणकारांनी दिली आहे. म्हणजेच दिवसाला साधारणतः 50 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
तुम्हाला 55 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर ३३,४०,००० रुपये मिळू शकतात. तर साठ वर्षांनंतर 34.70 लाख रुपये मिळू शकतात.