IAS Saurabh Katiyar : मुंबईच्या विकासाची धुरा 'यूपी' टॉपरच्या हाती; कोण आहेत सौरभ कटियार?

Rashmi Mane

कलेक्टरपदी नियुक्ती

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आठ IAS अधिकाऱ्यांचे बदल केले. मुंबई उपनगर जिल्ह्याचा नवा कलेक्टर म्हणून सौरभ कटियार यांची नियुक्ती झाली आहे.

IAS Saurabh Katiyar | Sarkarnama

सौरभ कटियार: नव्या जबाबदारीत प्रवेश

राज्य सरकारने 2016 बॅचचे आयएएस सौरभ कटियार यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

IAS Saurabh Katiyar | Sarkarnama

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता पुरस्कार विजेते

सौरभ कटियार यांना गेल्या महिन्यात मुख्यमंत्री गतिमानता पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या कार्यक्षमतेची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे.

Sarkarnama

मुंबई उपनगर जिल्ह्याचा परिचय

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा. मुख्यालय – वांद्रे. अंधेरी, कुर्ला, बोरीवली यांसारखे भाग यामध्ये येतात.

Sarkarnama

यूपीचा मिरगाव

सौरभ कटियार मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील मिरगावचे. त्यांनी IIT कानपूरमधून B.Tech व M.Tech केले आहे.

Sarkarnama

UPSC मध्ये यश

UPSC 2016 मध्ये देशात 334वी रँक. 2014 मध्येही परीक्षा उत्तीर्ण करत IRS सेवा मिळवली होती. आयएएसमध्ये निवड झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते आयकर विभाग (नागपूर) मध्ये आयआरएस म्हणून प्रशिक्षण घेत होते.

Sarkarnama

सौरभ कटियार

महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी सौरभ कटियार मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांचे कुटुंबीय कानपूर देहात जिल्ह्यातील सिकंदरा येथे राहतात.

Sarkarnama

कोचिंगशिवाय यशस्वी

सौरभ कटियार यांनी कोणतीही कोचिंग न घेता UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. 12 वीमध्ये 92.2% गुण मिळवत UP बोर्डात तिसरा क्रमांक मिळवला होता.

Sarkarnama

Next : RAW एजंटची ओळख गुप्त, मग पगार कुणाच्या बँक खात्यात जातो? 

येथे क्लिक करा