सरकारनामा ब्यूरो
"किसान विकास पत्र योजना" ही केंद्र सरकारची एक सुरक्षित आणि फायदेशीर योजना आहे.
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 115 महिन्यांत दुप्पट होणार आहेत. यावर सरकारकडून 7.5% निश्चित व्याज दिले जाणार आहे, आणि महत्वाचे म्हणजे यात कोणताही धोका नसतो.
"किसान विकास पत्र" ही पोस्ट ऑफिसची सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. या योजनेचे नाव "किसान" असले तरी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, तर गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी असणार आहे.
या योजनेत वन टाईम इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुमची रक्कम 9 वर्ष 7 महिन्यांत दुप्पट होणार आहे, तसेच खातेदाराला 7.5% पर्यंत व्याज मिळणार आहे.
ही भारत सरकारची 100% हमी असलेली सुरक्षित गुंतवणूक योजना असल्यामुळे शेअर बाजारातील चढउतारांचा यावर कोणताही परिणाम होत नाही. किमान गुंतवणूक 1 हजार रूपये इतकी आहे तर कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही.
आधार कार्ड, पॅन कार्ड (अनिवार्य आहे.)
पासपोर्ट / मतदार ओळखपत्र
पत्ता पुरावा, पासपोर्ट साईज फोटो
पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जा.. फॅार्म A भरा, KYC संबंधित कागदपत्रे जमा करा. गुंतवणूक रक्कम जमा करा. पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला किसान विकास पत्र (KVP Certificate) दिले जाईल.