Rashmi Mane
एकदाच गुंतवणूक करा आणि दरमहिन्याला मिळवा निश्चित उत्पन्न. पोस्ट ऑफिसची Monthly Income Scheme (MIS) सध्या सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोकप्रिय ठरत आहे. कमी जोखीम आणि हमखास परतावा यामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनेकडे आकर्षित होत आहेत.
शेअर मार्केटमधील चढ-उतार टाळून सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस MIS हा उत्तम पर्याय आहे. सरकारच्या पाठबळामुळे या योजनेत पैशांची सुरक्षितता अधिक मानली जाते.
ही योजना विशेषतः निवृत्त व्यक्ती, गृहिणी आणि दरमहिन्याला ठराविक उत्पन्न हवे असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. कमी जोखमीमध्ये स्थिर उत्पन्न मिळवण्याचा हा सोपा मार्ग आहे.
पोस्ट ऑफिस MIS अंतर्गत एकट्या व्यक्तीला जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवता येतात. तर जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते.
या योजनेवर सध्या 7.4 टक्के वार्षिक व्याज दिले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे व्याज दर महिन्याला खात्यात जमा केले जाते. त्यामुळे नियमित उत्पन्नाचा फायदा मिळतो.
जर तुम्ही जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपये गुंतवले तर सध्याच्या व्याजदरानुसार दर महिन्याला सुमारे 9,250 रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
15 लाखांच्या गुंतवणुकीवर वर्षभरात जवळपास 1.11 लाख रुपयांचे व्याज मिळू शकते. म्हणजेच दरमहा नियमित उत्पन्नासोबत सुरक्षित बचतीचाही फायदा मिळतो.
ही योजना 5 वर्षांसाठी असते. या कालावधीत फक्त व्याजातूनच सुमारे 5.55 लाख रुपयांची कमाई होऊ शकते. त्यामुळे दीर्घकालीन सुरक्षित उत्पन्नासाठी ही योजना आकर्षक मानली जाते.