पोस्ट ऑफिसचा 'हा 1 नियम' बदलेल तुमचं भविष्य; जाणून घ्या 15x5x5 चे गणित

Aslam Shanedivan

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात PPF योजनेतून दीर्घकालीन गुंतवणूक, चक्रवाढ व्याज आणि करसवलतीमुळे कोट्याधीश होता येतं

Post Office PPF Scheme | Sarkarnama

15X5X5 फॉर्म्युला

यासाठी 15X5X5 फॉर्म्युल्याचा वापर करून तब्बल 25 वर्षे गुंतवणूक ठेवल्यास 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा होतील.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

काय आहे योजना?

PPF ही सरकारची दीर्घकालीन बचत योजना असून या योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याजदर मिळतो. तर हा वेळोवेळी बदलूही शकते.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

फक्त 500 रुपये

PPF खात्यात मोठी रक्कम असणे आवश्यक नाही. या योजनेत किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. एका आर्थिक 1.5 लाख रुपये गुंतवता येतात.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

मूळ कालावधी

PPF खात्याचा मूळ कालावधी हा 15 वर्षांचा असतो. मात्र, 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी पुढे वाढवता येते.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

15X5X5 फॉर्म्युला?

मूळ कालावधी 15 वर्षे आणि त्यानंतर दोन वेळा 5-5 वर्षे अशा प्रकारे गुंतवणुकीची मुदत 25 वर्षे होते. यात चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळू शकतो.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

किती निधी?

PPF मध्ये एका वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये असे 15 वर्षांत 22.50 लाख रुपये होतात. 7.1 टक्के व्याजदर गृहीत धरल्यास 15 वर्षांनंतर व्याजासह हा निधी सुमारे 40.68 लाख रुपयांपर्यंत जातो.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

25 वर्षांनंतर 1 कोटी?

अशाच पद्धतीने मूळ कालावधीनंतर दोनदा 5-5 वर्षांची मुदतवाढ घेऊन गुंतवणूक सुरू ठेवल्यास 25 वर्षांनंतर 1.03 कोटी रुपये होऊ शकतात.

Post Office PPF Scheme | Sarkarnama

तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

आणखी पाहा