Rajanand More
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कामगिरीचे देशभरात कौतुक होत आहे. सोशल मीडियात त्यांच्या कामावर लोक फिदा झाले आहेत.
सोशल मीडियात मुंढे यांचे सुमारे अर्धा कोटी फॉलोअर्स आहेत. महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील फॉलोअर्सचा त्यामध्ये समावेश आहे.
IAS मुंढे यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली असून फॉलोअर्समध्येही वाढ होत आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे ३२ लाख, फेसबुकवर १४ लाख तर एक्स (आधीचे ट्विटर) वर अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अर्धा कोटी फॉलोअर्स असलेले मुंढे कुणाला फॉलो करतात, याबाबतही उत्सुकता आहे. पण इन्स्टाग्राम अन् फेसबुकवर ते कुणालाच फॉलो करत नाहीत. केवळ एक्सवर ते २८ जणांना फॉलो करतात.
मुंढे यांच्याकडून एक्सवर केवळ एकाच राजकीय नेत्याला फॉलो केले जात आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालयांचाही त्यात समावेश आहे. हे वगळता अन्य राजकीय नाव त्यामध्ये नाही.
तुकाराम मुंढे हे एक्सवर राजकीय नेत्यांमध्ये केवळ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाच फॉलो करतात.
प्रभू यांनी आतापर्यंत अटलबिहार वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे, वाणिज्य व उद्योग, नागरी उड्डाण अशी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत. रिसर्च स्कॉलर, अर्थतज्ज्ञ अशीही त्यांची ओळख आहे.
मुंढे हे एक्सवर राजकीय नेता तर सोडाच पण एकाही शासकीय विभाग, अधिकाऱ्यांना फॉलो करत नाहीत. लालबहादूर शास्त्री अकादमी, IAS असोसिएशन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, वर्ल्ड बँक ग्रुप आदी संस्थांच्या त्यांच्या लिस्टमध्ये आहेत.
एक्सवर फॉलो करत असलेल्या लिस्टमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र गुहा, एन. राम, सुचेता दलाल यांचीही नावे या लिस्टमध्ये आहेत.