Ganesh Sonawane
पोस्ट ऑफिसची आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट योजना आहे. यात दरमहा ठराविक रक्कम गुंतवता येते.
ही योजना सरकारच्या अंतर्गत येते. त्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.
दर महिन्याला फक्त ₹10,000 जमा करा. पाच वर्षांत एकूण ₹6 लाख गुंतवणूक होईल.
पाच वर्षांनी व्याजासह मिळतील ₹7,13,659. म्हणजेच ₹1,13,659 व्याज.
सध्या आरडीवर 6.7% वार्षिक व्याजदर आहे. दर तीन महिन्यांनी सरकार याचा आढावा घेते.
ही योजना पाच वर्षांसाठी आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुढे वाढवू शकता.
आरडी खात्यात तुम्ही एका वर्षात 12 हप्ते पूर्ण केले तर तुम्हाला जमा राशीच्या जवळपास 50 टक्के कर्ज मिळू शकते.
पण कर्जावरील व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक असतो.