Padma and Padma Shri awards : माजी मुख्यमंत्र्यांना मरणोत्तर 'पद्मभूषण'; अशोकमामासह महाराष्ट्रातील पाच जण 'पद्मश्री'!

Aslam Shanedivan

पद्म आणि पद्मश्री पुरस्कार वितरण

देशाची राजधानी नवी दिल्लीत मंगळवारी (ता.27) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूं यांच्या हस्ते पद्म आणि पद्मश्री पुरस्कारांचे वितरण झाले. ज्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश असून 1 पद्मभूषण आणि 5 पद्मश्री देण्यात आले आहेत.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

या सोहळ्याला उपराष्ट्रपती जयदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

राज्यातील 6 जणांचा सन्मान

यंदा पहिल्या टप्प्यात 71 आणि दुसऱ्या टप्प्यात 68 जणांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आले आहेत. दुसरा टप्पा मंगळवारी पार पडला असून यावेळी राज्यातील 6 जणांचा सन्मान करण्यात आला.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

मनोहर जोशी यांना मरनोत्तर पद्मभूषण

माजी लोकसभा अध्यक्ष तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरनोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून तो त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्वीकारला.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ

यावेळी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूं यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

गायिका अश्विनी भिडे

तसेच या कार्यक्रमात अतरौली घराण्याच्या ख्याल गायकी पंरपरेतील आघाडीच्या गायिका अश्विनी भिडे- देशपांडे, देवगिरी लिपीला नवसंजवनी देणारे कॅलिग्राफर अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

डॉ. विलास डांगरे आणि शेतकरी सुभाष शर्मा

अरोग्यसेवेतून गरजूंना मदत करणारे डॉ. विलास डांगरे, यवतमाळच्या प्रगतशिल शेतकरी सुभाष शर्मा यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

लालूंनी नातवाला दिले ‘या’ देवाचे नाव; कधी ऐकला नसेल हा शब्द...

आणखी पाहा