सरकारनामा ब्यूरो
जगातील प्रभावशाली महिलांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे.
इटलीत जन्म
सोनिया यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 मध्ये इटलीमध्ये स्टेफानो या गावात झाला.
केंब्रिज विद्यापीठात शिक्षण
कॅथोलिक शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झालं. इंग्रजी शिकण्यासाठी त्यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला.
राजीव गांधी आणि सोनिया यांनी 1968 मध्ये भारतात विवाह झाला.
1983 मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्त्व मिळालं.
राजीव गांधी यांच्या मृत्यूनतंर 1998 मध्ये राजकारणात प्रवेश करत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं.
सोनिया यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवलं परंतू पूर्ण बहुमत न मिळाल्याने त्या अपयशी ठरल्या.
यूपीएची स्थापन करुन पंतप्रधानपदी निवड करायची होती, त्या परदेशी असल्याने त्यांची निवड झाली नाही.
त्यांनी सल्लागार समितींच्या अध्यक्षपदी काम पाहिले. माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा अशा योजनांची तरतूद केली.
1998-2017 ते 2019-2022 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष राहिल्या. त्यांनी खासदार, विरोधीपक्ष नेत्या म्हणून कार्यभार सांभाळला आहे.