Rashmi Mane
नवीन उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आता मिळणार 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज!
मुद्रा योजना ही लघु उद्योग व स्वरोजगार सुरू करण्यासाठीची कर्ज योजना आहे.
केंद्र सरकारने ही योजना 8 एप्रिल 2015 ला सुरू केली होती.
नॉन-कॉर्पोरेट छोटे व्यावसायिक
मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स
दुकानदार, ट्रक ऑपरेटर
फळ-भाजी विक्रेते, फूड सर्व्हिस युनिट्स
रिटेल वर्कर्स, मशीन ऑपरेटर
आता ‘तरुण प्लस’ नावाची नवी कॅटेगरी सुरू झाली आहे. यामध्ये 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य झाले आहे.
ज्यांनी तरुण कॅटेगरीत कर्ज घेतले आणि वेळेवर फेडले आहे, त्यांना आता जास्त रकमेचे कर्ज मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
www.mudra.org.in या वेबसाईटवर जा.
आवश्यक कर्ज प्रकार निवडा.
अर्ज फॉर्म डाउनलोड करून प्रिंट घ्या.
फॉर्म नीट भरून सर्व कागदपत्रे जोडून बँकेत जमा करा.
या योजनेसाठी आवश्यक कादगपत्रे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र
जात प्रमाणपत्र (लागल्यास) तसेच व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे आणि इतर ओळख व पत्त्याचे पुरावे.