Rashmi Mane
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1957 रोजी कोलकाता येथे झाला.
प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल हे व्यावसायिक होते.
प्रफुल्ल पटेल यांचे वडील गोंदिया मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आमदारही होते.
प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जायचे. परंतु शरद पवारांशी फारकत घेत त्यांनी अजित पवार गटात सामील होणे पसंत केले.
प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा मोठा चेहरा मानलं जातं.
प्रफुल्ल पटेल यांनी 1985 मध्ये गोंदिया पालिकेचे नगराध्यक्ष बनून राजकारणात प्रवेश केला.
1991 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि खासदार झाले.
2009 मध्ये त्यांनी चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली अन् ते सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाले.
आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.
R