IPS Pragya Jain : गरोदरपणात UPSC परीक्षेत यश

Pradeep Pendhare

पहिल्या महिला DCP

डॉ. प्रज्ञा जैन उत्तर प्रदेशमधील बरुतमधील 2017 च्या बॅचच्या IPS असून त्यांनी 194 रँक मिळवली. पंजाबमध्ये कार्यरत असून अमृतसरच्या पहिल्या महिला DCP होण्याचा मान मिळवला आहे.

IPS Pragya Jain | Sarkarnama

ड्रगचा पर्दाफाश

लुधियाना आणि जालंधर आयुक्तालयात ADCP म्हणून कार्यरत असताना फार्मा ओपिओइड ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला. 60 लाखांहून अधिक किमतीची औषधे जप्त केली.

IPS Pragya Jain | Sarkarnama

शस्त्र जप्त

खन्ना इथं पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात 200 हून अधिक अवैध शस्त्र जप्त केली होती.

IPS Pragya Jain | Sarkarnama

मोठं यश

गरोदरपणात बेड रेस्टवर असतानाही त्यांनी UPSC परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात यश आले. पोलिस सेवेचे प्रशिक्षणही सोपे नव्हते. हिंमत ठेवत यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पंजाबमध्ये IPS अधिकारी बनल्या.

IPS Pragya Jain | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी

प्रज्ञा जैन उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरौत इथं झालं. त्यांचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर असून आई दिल्ली विद्यापीठाची पदवीधर आहे.

IPS Pragya Jain | Sarkarnama

वैद्यकीय शिक्षण

प्रज्ञा जैन इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. लोकांच्या मदतीसाठी त्यांनी होमिओपॅथिक डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण केलं.

IPS Pragya Jain | Sarkarnama

अन्य जबाबदाऱ्या

डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली. अनेक तास तिच्या क्लिनिकमध्ये काम करून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

IPS Pragya Jain | Sarkarnama

पहिले दोन प्रयत्न

पहिल्या प्रयत्नात मुलाखतीनंतर केवळ काही गुणांमुळे डॉ. प्रज्ञा जैन यांना अंतिम यादीत स्थान मिळाले नाही. दुसऱ्या प्रयत्नात प्रकृतीच्या कारणामुळं आणि मानसिक ताणतणावामुळे यश मिळाले नाही.

IPS Pragya Jain | Sarkarnama

कोचिंग न घेता यश

कोणतीही कोचिंग न घेता डॉ. प्रज्ञा जैन UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले.

IPS Pragya Jain | Sarkarnama

NEXT : पायी वारी करणारे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री : एकनाथ शिंदे