Vijaykumar Dudhale
शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 1995 मध्ये पहिल्यांदा पायी वारी केली हेाती. पायी वारी करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले होते.
मनोहर जोशी यांनीही वाखरी ते पंढरपूर असे पाच किलोमीटरचे अंतर पायी चालत पालखी सोहळ्यात सहभाग घेतला हेाता.
मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे हेही पालखी सोहळ्यात चालणार आहेत. पालखी सोहळ्याबरोबर चालणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरणार आहेत.
पायी वारी
जोशी यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे हेही वाखारी ते पंढरपूर अशी पायी वारी करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने पालख्यांना अनुदान जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना चार दिवस अन्नदान केले जाणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे आषाढी वारीची पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी लवकरच पंढरपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत
ठाणे जिल्ह्यातील एक पथक पंढरपूरमध्ये यात्रा कालावधीत काम करणार आहे.