Rajanand More
धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे.
प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या ग्राहक व्यवहार, अन्य व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा हे खाते आहे.
जोशी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्नाटकातील विजयपूर येथील आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.
कर्नाटकातील हुबळी येथील केएस आर्ट्स कॉलेजमधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली आहे. हुबळी येथील इदगाह मैदान आंदोलनातून ते पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते.
प्रल्हाद जोशी हे २००४ पासून ते धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून, सलग निवडून येत आहेत. कर्नाटकातील सर्वाधिक काळ लोकसभेत निवडून जाणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात प्रल्हाद जोशी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) शीही संबंध होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्याकडे संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी होती.
पंतप्रधान मोदींचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून जोशी यांची ओळख आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात त्यांच्या खांद्यावर शिक्षण मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आल्याचे मानले जाते.