सरकारनामा ब्यूरो
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
झी मराठीवरील 'जुळून येते रेशीमगाठी' या मालिकेमधून तिने करियरला सुरुवात केली. सध्या ती 'हास्य जत्रा' या कॅामेडी शोमध्ये अँकरिंगमुळे घराघरात पोहचली.
तिने आतापर्यत डॉ.काशिनाथ घाणेकर, लकडाऊन आणि नुकताच 2024 मध्ये प्रदर्शित झालेला फुलवंती अशा अनेक हिट मराठी चित्रपटांत काम केले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी आता सिनेमा किंवा नाटकासाठी चर्चेत आली नाही तर राजकीय कारणाने तिची चर्चा होत आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणावरुन आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिच्या नावाचा उल्लेख 'परळी पॅटर्न' असा केला होता.
या वक्तव्यावर आक्षेप घेत तिने याविरोधात पत्रकार परिषद घेतली होती. महिला आयोगाकडे तक्रारही केली.
2023 मध्ये प्राजक्ता माळी (RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात गेल्या होत्या. RSS ही भाजपाची संस्था आहे. त्यामुळे प्राजक्ता हिची राजकीय विचारसरणी असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
धनजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही यापूर्वी प्राजक्ता माळी यांच नाव धनंजय मुंडे यांच्याशी जोडले होते.
सोमवार (ता.30) ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन केले. आणि तिच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ पसरविणाऱ्यावर कडक कारवाईची मागणीही केली.