Aslam Shanedivan
नेपाळमधील पाळ सरकारने 4 सप्टेंबर 2025 रोजी मोठा निर्णय घेत सोशल साईटवर बंदी घातली आहे. ज्यानंतर काठमांडूत हजारो जनरेशन जेट (Gen Z) चे तरुण रस्त्यांवर उतरले आहेत.
नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, यूट्यूब आणि एक्ससहीत 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे. याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत 16 तरुणांचा मृत्यू झाला आहे.
पण सोशल मीडियावर बंदी लादणारा नेपाळ हा काही पहिला देश नाही. इतर पाच असेही देश आहेत, जेथे सोशल मीडियावर सक्त निर्बंध आहेत.
चीनमध्ये सोशल मीडियावर सक्त निर्बंध असून येथे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि एक्स सारखे प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बॅन आहे. येथे विरोध केल्यास मोठा आर्थिक दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
किम जॉन्ग उन यांच्या उत्तर कोरियात सोशल मीडियाच काय तर इंटरनेटलाही सर्वसामान्यांना बंदी आहे. पण जर कोणी बेकायदेशीर कृतीतून सोशल मीडियावर पोस्ट टाकलीच तर मृत्युदंड देखील दिला जाऊ शकतो.
इराणमध्ये देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली फेसबुक आणि एक्स, युट्युब सारख्या प्लॅटफॉर्म्सना बंदी आहे. येथे सरकारच्या विरोधात पोस्ट टाकल्यास तुरुंगवास किंवा मृत्यदंडाची शिक्षा होते.
अफगाणिस्तान देखील सोशल मीडियावर बंदी असणारा देश असून फोटो काढणे आणि तो शेअर केल्यास तालिबानी शिक्षा मिळू शकते.
सौदी अरबमध्ये सोशल मीडियावर सरकारची करडी नजर असते. येथे सरकार विरोधी आणि धार्मिक भावनांना ठेच पोहचवणाऱ्या पोस्टसाठी तुरुंगवास किंवा दंड वा मृत्यूची शिक्षा आहे.