Jagdish Patil
बंगळूरू विशेष न्यायालयाने जनता दल (सेक्युलर)चा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्याला शनिवारी (ता.02 ) शिक्षा सुनावणली जाणार आहे.
मागील वर्षी फार्महाउसमध्ये काम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेने प्रज्वल रेवण्णाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली होती.
यामध्ये 2021 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
त्याच्यावर 50 हून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार, धमकी देणे, अश्लील फोटो व्हायरल करणे अशा विविध कलमांखाली आरोप करण्यात आलेत.
प्रज्वल माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणुकीपूर्वी हसनमध्ये त्याचा एक पेन-ड्राइव्ह समोर आल्यानंतर त्याचे कारनामे उघडकीस आले.
पेन ड्राइव्हमधील 3 ते 5 हजार व्हिडीओंमध्ये तो महिलांचे लैंगिक छळ करताना दिसतोय. हे प्रकरण वाढल्यानंतर राज्य सरकारने SIT स्थापन करत त्याच्या विरोधात FIR दाखल केला.
SIT ने आपल्या तपासात उघड केलं की प्रज्वलने 50 हून अधिक महिलांचे लैंगिक छळ केला. या महिला 22 ते 61 वयोगटातील होत्या.
50 पैकी सुमारे 12 महिलांवर जबरदस्तीने बलात्कार केल्याचं तर उर्वरित महिलांवर आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यातं तपासात उघड झालं.
रेवण्णाने राजकीय ताकद वापरत काही महिलांना सब-इन्स्पेक्टर, तहसीलदार, तर काहींना अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी मिळवून दिल्याचं उघडकीस आलं आहे.