Mayur Ratnaparkhe
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूरात जंगी स्वागत केले.
एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा तब्बल ऐंशी पेक्षाही अधिक जेसीबी लावून फुलांची उधळण केली गेली.
एवढंच नाहीतर क्रेनच्या सहय्याने २१ फूटी भला मोठा हार देखील एकनाथ शिंदे यांना घालण्यात आला.
भव्य स्वागत झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील भारावून गेले होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला दिलेल्या भरभरून यशामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सरवडे येथे आभार यात्रा आयोजित करण्यात आली होती.
एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबीटकर यांना आमदार करा, मी नामदार करतो, असा शब्द देत राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदार संघातील जनतेला वचन दिले होते.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधून त्यांचे स्वागत केले.
यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे केलेल्या स्वागतामुळे उपस्थित शिवसैनिकांच्या डोळ्याचे अक्षरशा पारणे फिटले.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघात आज शिवसेनेकडून महायुतीचा महाविजय साजरा केला गेला.