सरकारनामा ब्यूरो
मराठा समाजाचे नेते झोपले होते. या सर्व नेत्यांना बाजूला ढकलून एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो ठरले आहेत, असे आंबेडकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंबद्दल मराठा समाजात सहानुभूती वाढली आहे. आता शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर झालेत. सगळ्यांना त्यांनी क्लिन बोल्ड केले आहे, असे आंबेडकर पुढे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, असे मोठे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी शिंदेंचे कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या विधानावरून वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील निर्णयामुळे भाजपचे मोठे नुकसान होणार आहे. भाजपने शिंदेंना पुढे करून ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र यात मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा फटका भाजपला बसणार आहे, असे आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे वंचितबाबत सकारात्मक होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे. या धाडसी निर्णयाचा शिंदे यांना मोठा फायदा होईल, असे भाकित आंबेडकरांनी केले.
आम्ही आजही महाविकास आघाडीचे घटक नाही. आम्हाला फक्त चर्चेसाठी बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचे 42 उमेदवार तयार आहेत. आताच आम्ही नावे जाहीर करणार नाही, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.