Prakash Javadekar : काँग्रेस अन्‌ डाव्यांच्या बालेकिल्ल्यात प्रकाश जावडेकर कमळ फुलवणार...?

Vijaykumar Dudhale

हिंदुत्ववादी घरात जन्म

प्रकाश जावडेकर यांचा जन्म 30 जानेवारी 1952 रोजी पुण्यात कट्टर हिंदुत्ववादी घरात झाला. जावडेकर यांचे वडिल अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते.

Prakash Javadekar | Sarkarnama

विद्यार्थी परिषदेचे सदस्य

महाविद्यालयीन काळातच प्रकाश जावडेकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य बनले होते.

Prakash Javadekar | Sarkarnama

युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव

जावडेकर यांनी 1971 ते 1981 या दहा वर्षांच्या कार्यकाळात बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली. 1984 ते 1990 पर्यंत जावडेकर हे राष्ट्रीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव आणि त्यानंतर महासचिव होते.

Prakash Javadekar | Sarkarnama

विधान परिषद सदस्य

प्रकाश जावडेकर हे 1990 ते 2002 महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते.

Prakash Javadekar | Sarkarnama

राज्यसभा सदस्य

जावडेकर 2008 मध्ये महाराष्ट्रातून, तर 2014 मध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही काम केले.

Prakash Javadekar | Sarkarnama

केंद्रीय मंत्री

भारतीय जनता पक्षाला 2014 च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात जावडेकर हे माहिती प्रसार, पर्यावरण आणि संसदीय कार्यमंत्री खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) बनले.

Prakash Javadekar | Sarkarnama

कॅबिनेट मंत्री

खातेबदलानंतर 5 जुलै 2016 रोजी जावडेकर यांच्याकडे महत्वपूर्ण असे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले होते. ते कॅबिनेट मंत्री बनले.

Prakash Javadekar | Sarkarnama

निवडणूक प्रभारी

जावडेकर यांना 7 जुलै 2023 रोजी तेलंगणाचे, तर 27 जानेवारी 2024 रोजी केरळचे भाजपचे निवडणूक प्रभारी बनविले आहे.

Prakash Javadekar | Sarkarnama

पाच मागण्या पूर्ण केल्यास राजकारण सोडणार; केजरीवालांनी काय मागण्या केल्या ?

CM Arvind Kejriwal: | Sarkarnama