Mangesh Mahale
जजची परीक्षा पास, पण नोकरीऐवजी संन्यास! प्रखरश्री दीदींच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा
मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये प्रखरश्री दीदी यांच्यासह पाच तरुणींची भव्य बिनौली मिरवणूक काढण्यात आली.
विंटेज कारचा ताफा, शाही बग्ग्या आणि उदयपूरहून आलेले बँडपथक; निरोप सोहळ्याला राजेशाही थाट!
प्रखरश्री दीदी यांनी न्यायाधीश होण्याची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र, पदावर रुजू होण्याआधीच त्यांनी वेगळा मार्ग निवडला.
आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जजची परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवले. पण मनात लहानपणापासूनच वैराग्याची भावना होती.
न्यायाधीश किंवा वकील होण्यापेक्षा भगवान महावीरांच्या मार्गावर चालून समाजाची अधिक सेवा करता येईल, अशी त्यांची भावना आहे.
याच विचारातून प्रखरश्री दीदी यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
जैन दादावाडी येथे पाचही दीक्षार्थींची पारंपरिक गोदभराई करण्यात आली. दीक्षेनंतर रंगीत कपड्यांऐवजी पांढरी वस्त्रे धारण करणार असल्याचे रंगोली दीदी यांनी सांगितले.
22 नोव्हेंबरला प्रखरश्री दीदी यांच्यासह पाचही तरुणी जैन दीक्षा घेणार आहेत. त्याआधी कुटुंबीय आणि जैन समाजाने त्यांना भव्य निरोप दिला.