Rajanand More
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपने जग पादाक्रांत केले आहे. भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या उद्योगाचे जाळे निर्माण केले आहे.
अदानींच्या उद्योगविश्वाला झळाळी देण्यात प्रणव अदानी यांचा मोठा वाटा मानला जातो. त्यांनी आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर अदानी ग्रुपला विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे.
प्रणव आणि गौतम अदानी यांचे रक्ताचे नाते आहे. ते गौतम अदानींचे पुतणे आहेत. गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू विनोद अदानी हे त्यांचे वडील आहेत.
प्रणव हे सध्या अदानी ग्रुपमध्ये व्यपस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्याकडे कृषी, ऑईल आणि गॅस या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची जबाबदारी आहे.
अदानी गॅस लिमिटेड कंपनीला भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील सूचीबध्द गॅस वितरण कंपनी बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
अदानींचा कृषी उद्योगात प्रवेश करण्यामध्येही प्रणव यांचा सहभाग महत्वाचा होता. अदानी कृषी लॉजिस्टिक्स आणि अदानी अग्री फ्रेशच्या स्थापनेत त्यांची महत्वाची भूमिका होती.
मॅसॅच्युसेट्समधील प्रतिष्ठित बोस्टन विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली आहे. तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनाची पदवी मिळवली आहे.
प्रणव अदानी यांच्यावर सेबीने इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप केला आहे. त्यांनी एका कंपनीसोबतच्या कराराची गोपनीय माहिती आपल्या मेव्हण्याला दिल्याचा दावा सेबीने केला आहे.