Vijaykumar Dudhale
महाविकास आघाडीच्या सोलापुरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रणिती शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेस भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रमुख वक्त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
पंढरपूरचे बीआरएसचे नेते भगीरथ भालके यांनी आपल्या गटाचा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.
भाजपला माजी खासदारांना सोबत घेऊन फिरायला लाज वाटते का, असा तिखट सवाल प्रणिती शिंदे यांनी भाजपला विचारला.
वडील सुशीलकुमार शिंदे आणि आई उज्ज्वला शिंदे हे दोघेही लेकीचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते.
नाना पटोले यांनीही भाजपवर टीका करताना ‘आम्ही एकनाथ शिंदे यांना विधानसभेच्या अधिवेशनातच भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता,’ असे म्हटले आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.
काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीत रंगत भरली आहे.
R