Prasanna Varale Appoint Supreme Court Justices : सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी तीन दलित न्यायमूर्ती

Roshan More

सरन्यायाधीशांनी दिली शपथ

कर्नाटक हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. सरन्यायाधीस चंद्रचूड यांना वराळे यांनी पदाची शपथ दिली.

Prasanna Varale | sarkarnama

सुप्रीम कोर्टात तीन दलित न्यायमूर्ती

सुप्रीम कोर्टात वराळे यांच्या नियुक्ती नंतर तीन दलित न्यायमूर्ती झाले आहेत. याआधी बी. आर. गवई आणि सी.टी. रवीकुमार हे दलित न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टात न्यायदानाचे काम करत आहेत.

Prasanna Varale | sarkarnama

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांशी संबंध

न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांचे आजोबा बळवंतराव वराळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय होते. बाबासाहेबांच्या आग्रहावरूनच बळवंतराव निपाणी गाव सोडून संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) आले.

Prasanna Varale | sarkarnama

लोया यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली

न्यायमूर्ती वराळे यांनी अॅड. एस. एन. लोया यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली.

Prasanna Varale | sarkarnama

सरकारी वकील म्हणून काम

वराळे यांनी मुंबई सुप्रीम कोर्ट तसेच औरंगाबाद खंडपीठामध्ये सरकारी वकील म्हणून काम केले आहे.

Prasanna Varale | sarkarnama

प्राध्यापक म्हणून काम

न्यायमूर्ती वराळे यांनी संभाजीनगर येथील आंबेडकर विधी महाविद्यालयात 1990 ते 1992 पर्यंत प्राध्यापक म्हणूनही कार्य केले आहे.

Prasanna Varale | sarkarnama

मुंबई न्यायालयात न्यामूर्ती

वराळे यांची 2008 मध्ये मुंबई न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. 14 वर्ष ते येथे कार्यरत होते.

Prasanna Varale | sarkarnama

कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती

प्रसन्ना वारळे यांचे ऑक्टोबर 2022 मध्ये कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

Prasanna Varale | sarkarnama

NEXT : पंतप्रधान मोदींसाठी असतो प्रजासत्ताक दिन खास, पाहा त्यांचे आतापर्यंतचे लूक्स

Narendra Modi | sarkarnama
येथे क्लिक करा