Roshan More
मैथली ठाकूरची भाजपकडून चर्चा सुरू असताना बिहारमधील लोकप्रिय गायक रितेश पांडे यांना प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने उमेदवारी घोषित केली.
जनसुराज पक्षाने बिहार विधानसभा निवडणुका 2025 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
काराकाट मतदारसंघातून रितेश पांडे यांना जनसुराजने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
रितेश पांडे ज्या काराकाट मतदारसंघातून उमेदवार आहेत तो मतदारसंघ प्रशांत किशोर यांचे जन्मस्थान आहे.
रितेश पांडे यांनी याच वर्षी जुलै महिन्यात जनसुराज पक्षात प्रवेश केला होता
त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणजे ‘हॅलो कोण’, ज्याला यूट्यूबवर तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
बिहारमध्ये मतदान दोन टप्प्यांत म्हणजेच 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार असून निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केले जातील.