Roshan More
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा बिहार विधानसभेत दारुण पराभव झाला. त्यांनी एकही जागा जिंकता आली नाही.
प्रशांत किशोर यांनी आपली 90 टक्के संपत्ती जन सुराज पक्षाला दान करण्याचे जाहीर केले आहे.
त्यांनी सांगितले की, दिल्लीतील फक्त एक त्यांचा बंगला त्यांच्या नावावर ठेवणार आहेत. बाकी सर्व संपत्ती जन सुराजला दान करणार आहेत.
जनसुराजला पाठींबा देण्यासाठी जनतेने एक हजाराची देणगी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रशांत किशोर म्हणाले, जे पक्षाला एक हजाराची देणगी देणार नाही त्यांना आपण भेटणार नाही.
ते म्हणाले, मला भेटण्यासाठी पक्षाला एक हजाराची देणगी देणे ही माझी अटच आहे.
प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभेतील पराभवाबाची जबाबदारी स्वीकारत बिहारसाठी दुप्पट शक्तीने पुन्हा काम करत नवीन राजकीय पर्याय तयार करणार असल्याचे म्हटले.