Vijaykumar Dudhale
पंढरपूरच्या पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांनी आपले काका (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी रिडालोसकडून पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता.
प्रशांत परिचारक यांनी डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे यांचा पराभव केला होता.
विधान परिषदेच्या 2015 च्या निवडणुकीपासून ते भाजपसोबत आहेत. प्रशांत परिचारक यांचे काका सुधाकर परिचारक यांनी 2019 ची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती.
पंढरपूर विधानसभेच्या 2021 च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर प्रशांत परिचारक यांचा दावा होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीनंतर त्यांनी माघार घेत समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला होता.
पोटनिवडणुकीनंतर काही दिवसानंतर मात्र परिचारक आणि आवताडे गटात शीतयुद्ध सुरू झाले. त्यातून परिचारक गटाने आवताडेंच्या ताब्यातील संत दामाजी कारखाना निवडणुकीत हिसकावून घेतला.
बार्शीच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची परिचारक यांच्या कट्टर समर्थकांनी भेट घेतली आहे, त्यामुळे परिचारक काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
येत्या शनिवारी ((ता. 17 ऑगस्ट)) परिचारक गट मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे