Roshan More
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देशाली पहिली टेस्ला कार मुंबईतील शोरुममधून खरेदी केली आहे.
देशातील पहिली टेस्लाकार मीच खरेदी करणार असा निर्धार सरनाईक यांनी बोलून दाखवला होता.
सरनाईकांनी सांगितले की ही कार आपण मुलाला नाही तर नातवाला देत आहोत कारण तो ही कार घेऊन शाळेत जाईल आणि सर्वांना पर्यावरण पूरक कारचा संदेश जाईल.
सरनाईक यांनी खरेदी केलेली टेस्ला कार ही माॅडल वाय आहे. ही इलेक्ट्रिक कार आहे.
टेस्ला माॅडेल Y च्या आरडब्लू डीची किंमत 61.7 लाख आहे.
ही कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते.
ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ही 622 किलोमीटरचे अंतर प्रवास करू शकणार आहे.