सरकारनामा ब्यूरो
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
प्रतिभाताई यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 ला जळगाव जिल्ह्यातील नडगाव येथे झाला. प्राथमिक शिक्षण येथूनचं त्यांनी पूर्ण केलं.
मुळजी जेठा या महाविद्यायातून राज्याशास्त्र आणि अर्थशास्त्र पदवी तर, शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली.
वडील नारायण पाटील यांच्या प्रेरणेमुळे वयाच्या 27व्या वर्षी प्रतिभाताईंनी राजकारणात प्रवेश केला.
मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार म्हणून प्रतिभाताई 1967 मध्ये पहिल्यांदा विजयी झाल्या. या मतदारसंघाचे त्यांनी 1985 पर्यंत नेतृत्व केले.
सलग चार वेळा विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.
आमदार, खासदार, राज्यपाल आणि राष्ट्रपती असा प्रतिभाताई यांचा प्रवास राहिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या त्या अध्यक्ष देखील राहिल्या आहेत. तर, राजस्थानच्या त्या राज्यपाल देखील होत्या.
8 नोव्हेंबर 2004 ला प्रतिभाताई यांची नियुक्ती राजस्थानच्या 17 व्या राज्यपालपदी करण्यात आली.
महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले.
प्रतिभाताई यांनी 15 पुस्तके लिहिली आहेत त्यांत मराठीतील ’भारत जागवा’, हिंदीमधील ’भारत जगाओ’ या पुस्तकाचा समावेश आहे.