Rashmi Mane
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज 89वा वाढदिवस.
प्रतिभाताईंचा जन्म 19 डिसेंबर 1934ला महाराष्ट्रातील नडगाव जिल्ह्यात झाला.
पाटील यांनी जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण आणि मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
एक यशस्वी राजकारणी आणि समाजसेविका म्हणून त्या ओळखल्या जातात. वडिलांच्या प्रेरणेने प्रतिभाजींनी देशाच्या राजकारणात प्रवेश केला होता.
वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रतिभा पाटील यांनी जळगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या.
1962 मध्ये प्रतिभा पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर त्यांनी 1985 पर्यंत सातत्याने आमदारपद भूषवले.
प्रतिभा पाटील यांनी 1986 ते 1988 या काळात राज्यसभेचे उपसभापतीपद भूषवले.
'यूपीए'ने 2007 मध्ये प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. १२व्या राष्ट्रपती होण्याचा मान देखील त्यांना मिळाला.