Rashmi Mane
प्रतीक यादव हे समाजवादी परिवारातील सदस्य असले तरी त्यांची ओळख केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती. लक्झरी कार्स, सुपरबाईक्स आणि फिटनेसप्रेमी व्यक्तिमत्त्वामुळे ते कायम चर्चेत राहिले.
प्रतीक यादव यांच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या विदेशी गाड्या होत्या. विशेषतः त्यांची लॅम्बोर्गिनी लखनऊच्या रस्त्यांवर नेहमी चर्चेचा विषय ठरत असे. सुपरकार्ससोबतच त्यांना हाय-एंड सुपरबाईक्सचाही मोठा छंद होता.
फिटनेस क्षेत्रातही प्रतीक यादव यांचे नाव चर्चेत होते. त्यांनी लखनऊमध्ये “द फिटनेस प्लॅनेट” नावाचे जिम सुरू केले होते. फिटनेस, बॉडीबिल्डिंग आणि आधुनिक लाइफस्टाइलमुळे तरुणांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती.
प्रतीक यादव यांनी ब्रिटनमधील University of Leeds येथे शिक्षण घेतले होते. परदेशात शिक्षण पूर्ण करूनही त्यांचे सैफई गाव आणि कुटुंबीय परंपरांशी घट्ट नाते कायम राहिले.
राजकीय घराण्यात जन्म असूनही त्यांनी सक्रिय राजकारण टाळले. रिअल इस्टेट आणि फिटनेस व्यवसायात त्यांनी स्वतःची ओळख तयार केली. “जीव आश्रय” संस्थेमार्फत ते भटक्या कुत्र्यांच्या उपचार आणि देखभालीचे कामही करत होते.
अपर्णा यादव आणि प्रतीक यादव यांची ओळख शाळेत 9वीत असताना झाली होती. कालांतराने दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि 2011 मध्ये दोघांनी विवाह केला. त्यांच्या लग्नाला देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
होळी असो किंवा सैफई महोत्सव, प्रतीक यादव यांची उपस्थिती जवळपास निश्चित मानली जायची. कुटुंबीय कार्यक्रम आणि गावाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं कायम चर्चेत राहिलं