सरकारनामा ब्यूरो
उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी हे धावपळीच्या जगात त्यांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य तदुंरस्त कसे ठेवतात जाणून घेऊयात...
शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर समाजसेवा आणि त्यानंतर राजकारण अशा क्षेत्रात प्रवेश करुनही प्रवीण स्वामी त्यांची शारीरिक तंदुरुस्ती कशी जपता येईल, यावर फोकस ठेवतात.
राजकीय कामामुळे सतत धावपळ आणि तणावाचे वातावरण असते. यामुळे मानसिक आरोग्य तदुंरुस्त ठेवण्यासाठी जुनी गाणी ऐकणे, वाचन करणे, चालणे, व्यायाम, सात्त्विक आहार, पुरेशी विश्रांती हा मूलमंत्र असल्याचे प्रवीण स्वामी म्हणतात.
ज्याप्रमाणे ते कामामध्ये कोणतेही अंतर पडू देत नाहीत, तसेच ते व्यायामातही कधीच अंतर पडू देत नाहीत. दररोज पहाटे लवकर उठून ते व्यायामासाठी तासभर वेळ काढतात.
आहारावरही नियंत्रण ठेवून भरपूर पाणी पिणे आणि वेळेवर आहार घेण्याला ते प्राधान्य देतात.
हॉटेलचे मसालेदार पदार्थ चहा, कॉफी न घेता, ज्यूस, फळे, शेंगांचे लाडू, ड्रायफ्रूट आणि दिवसभरात नाश्ता, दुपारीचे जेवण, रात्रीच्या जेवणात पालेभाज्या, भाकरी असा सात्विक आहार ते घेतात.
कामामुळे दुपारच्या आणि सांयकाळच्या जेवणाची वेळ सांभळता येत नाही. नेहमी घरचा डबा सोबत नसल्याने हलका आहार घेणे याकडे लक्ष असते, असे ते म्हणतात.
कामामुळे दौरा असल्याने पहाटे व्यायाम करायला जमत नसल्यास, रात्री जेवल्यानंतर काही वेळ शतपावली करून ते पुरेशी झोप घेतात.