सरकारनामा ब्यूरो
आयएएस अधिकारी क्राती राज यांनी सरकारी आरोग्य केंद्रात जाऊन अचानकपणे तपासणी केली होती.
2021 मध्ये नागरी सेवा परीक्षेत 106 व्या रँकसह क्राती यांनी UPSC पास केली होती.
आयएएस क्राती यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या झाशी येथे झाला. त्याच शहरातून कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी बीटेक केले.
अचानक आणि अनोख्या पद्धतीची तपासणी केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यापासून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
अनेक तक्रारी आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील सरकारी आरोग्य केंद्राची तपासणी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
आरोग्य केंद्रात जाताना त्या स्वतः पेशंटच्या वेशात आल्या आणि रुग्णालयातील इतर रुग्णांसह बुरखा घालून त्यांनी उभ्या राहूनच हॉस्पिटलचे निरीक्षण केले.
तपासणीदरम्यान त्यांना रुग्णालयात अनेक समस्या जाणवल्या, तसेच गैरव्यवहारही अनुभवले.
वेळेत डॉक्टर उपस्थित नसतात, तसेच तेथील डाॅक्टरांची वागणूकही चुकीची असल्याने त्यांना कठोर पाऊल उचलावे लागले.
सगळी परिस्थिती स्वत: अनुभवल्यानंतर तत्काळ त्यात बदलही त्यांनी करून घेतले.
R