सरकारनामा ब्यूरो
अनेक दिवसांपासून बॉलीवूड चित्रपटसृष्टीतून प्रीती झिंटा लांब असली तरीही,ती कोणत्या न कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते.
महाकुंभमेळ्यादरम्यान त्रिवेणी संगमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून प्रीती तिच्या 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असून पोस्ट करत असते.
लवकरच ती 'लाहौर 1947' या चित्रपटातून मोठा पडद्यावर पुन्हा पर्दापण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रेस काॅन्फरन्समध्ये तिला एका फॅन्सने प्रश्न विचारला, तुम्ही राजकारणात येण्याचा विचार करत आहात का?
यावर प्रीतीने उत्तर दिले की, 'नाही मला राजकारणात येण्यास रस नाही.'
प्रीतीने सांगितले तिला गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय पक्षांकडून तिकिटे आणि राज्यसभेच्या जागासाठी ऑफर आल्या होत्या.
राजकीय पक्षांच्या आणि राज्यसभेच्या ऑफर्सना मी नम्रपणे नकार दिला आहे. पण मला कधीही राजकरणात जायचं नव्हत. अस प्रीती झिंटा यावेळी म्हणाली.
प्रीती झिंटा म्हणाली मला तुम्ही "फौजी म्हणणे पूर्णपणे चुकीचे नाही कारण मी एका सैनिकाची मुलगी आणि एका सैनिकाची बहीण आहे.