Aslam Shanedivan
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मुंबईवर 2008 मध्ये 26/11 हल्ल्यावरून चर्चा झाली
या चर्चेनंतर ट्रम्प यांनी मुंबईवरील हल्ल्याचा खतरनाक दहशतवादी भारताकडे सुपूर्द केला जाईल अशी घोषणा केली
मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणणारा मास्टर माईंड तहव्वुर राणाच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाई बिझनेसमन असून त्याचा 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्वाचा हात होता
तहव्वुर राणावर हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आणि लश्कर-ए-तैयबाचा सक्रीय सदस्य असल्याचा आरोप आहे
26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेविड कोलमॅन हेडलीची असून तहव्वुर राणाने त्याची मदत केली होती. या हल्लामुळे अख्खा महाराष्ट्र सून्न झाला होता.