Rashmi Mane
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सोमवारी 2 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार विनय कोरे यावेळी उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.
यावेळी मुर्मू यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली.
तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दौपदी मुर्मू यांना अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती दिली.
मुर्मू यांनी मंदिरातील देवीच्या किरणोत्सव आणि दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली.
श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्णसोहळा आणि वारणाविद्यापीठ उद्घाटन समारंभ कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आली.