Pradeep Pendhare
देशातील सर्वोच्च न्यायालयात तब्बल 82 हजार 831 खटले प्रलंबित आहेत. आजपर्यंतच्या प्रलंबित प्रकरणांची ही सर्वात मोठी संख्या आहे.
न्याय मिळवण्यासाठी लाखो लोकांना न्यायालयाकडून केवळ ‘तारीख पे तारीख’ मिळत असते. गेल्या वर्षभरात केवळ 27 हजार 604 प्रलंबित प्रकरणांची नोंद झाली आहे.
2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयात 38 हजार 995 नवीन खटले दाखल करण्यात आले. यात राजकीय खटल्याची संख्या वाढली आहे.
2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयात 38 हजार 995 नवीन खटले दाखल झाली. गेल्या 10 वर्षांत प्रलंबित प्रकरणांची संख्या 8 पटींनी वाढली आहे.
2014 मध्ये उच्च न्यायालयात एकूण 41 लाख खटले प्रलंबित होते. या खटल्यांची संख्या आता 59 लाखांपर्यंत पोचली. प्रलंबित प्रकरणे ही गेल्या 10 वर्षांमध्ये एकदाच कमी झाली.
2024मध्ये ट्रायल कोर्टात 2.6 कोटी खटले प्रलंबित होते. ते आता वाढून 4.5 कोटींवर पोचले आहेत.
2009मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 26 होती. ती वाढवून 31 करण्यात आली. 2019 मध्ये संसदीय कायद्या अंतर्गत न्यायाधीशांची संख्या 31वरून 34पर्यंत वाढवण्यात आली.