Droupadi Murmu : 'या' कारणाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा महाराष्ट्रात दौरा रद्द...

Rashmi Mane

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येत्या 27 ते 29 जुलैदरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येणार होत्या पण अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द करण्यात येत असल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने कळविले आहे.

Draupadi Murmu | Sarkarnama

विविध कार्यक्रमांना भेट

राष्ट्रपती पुणे, कोल्हापूर, मुंबई, नांदेड, लातूर येथील विविध कार्यक्रमांना भेट देणार होत्या.

Draupadi Murmu | Sarkarnama

पूरस्थिती

महाराष्ट्रातील पूरस्थिती तसेच अन्य कारणांमुळे दौरा रद्द केल्याचे समजते.

Droupadi Murmu | Sarkarnama

कोल्हापुरात कार्यक्रम

राष्ट्रपती मुर्मू यांचे कोल्हापूर जिल्ह्यातून २८ जुलैला सायंकाळी सहा वाजता पुण्यात आगमन होणार होते. त्यानंतर राजभवन येथे मुक्काम नियोजित होता.

Droupadi Murmu | Sarkarnama

महापुरामुळे रद्द

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीसह वारणा नदीला देखील महापूर आला आहे. त्यामुळे रविवारचा कोल्हापूर जिल्ह्यातील दौरा महापुरामुळे रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

अपरिहार्य कारणास्तव दौरा रद्द

मुंबई येथे विधानसभेच्या शतक महोत्सवानिमित्त 'वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व' या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार होते. मात्र, अपरिहार्य कारणास्तव राष्ट्रपती मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.

Droupadi Murmu | Sarkarnama

Next : थेट मोदी सरकारने नियुक्तीवर आक्षेप घेतलेल्या कोण आहेत IAS के वासुकी? 

येथे क्लिक करा