Deepak Kulkarni
मेजर नव्या शेखावत यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या Aide-de-Camp (ADC) म्हणून नियुक्ती झाली आहे.
नव्या शेखावत या राष्ट्रपतींच्या ADS पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आर्मी ऑफिसर ठरल्या आहेत.
मेजर नव्या शेखावत यांचा लष्करातील प्रवास Combined Defence Services (CDS) या सर्वात कठीण परीक्षेपासून सुरू झाला आहे.
ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेतली जाते.यानंतर नव्या यांनी त्यांचं लष्करी प्रशिक्षण चेन्नईच्या Officers Training Academy (OTA) येथे पूर्ण केलं.
लष्करी प्रशिक्षणानंतर त्यांची Army Service Corps (ASC) मध्ये नियुक्ती झाली. एएससी सैन्यादलांच्या तुकड्यांना आवश्यक असणारा पुरवठा, वाहतूक आणि इतर आवश्यक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पार पाडते.
नव्या शेखावत यांना 2021 च्या मध्यात प्रमोशन मिळाले. त्यानंतर काही वर्षांतच त्या मेजर पदावर पोहोचल्या.
शेखावत या राष्ट्रपतींच्या ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या दुसऱ्या महिला अधिकारी असल्या,तरी भारतीय लष्करातून या पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
यापूर्वी 2025 मध्ये राष्ट्रपतींच्या ADC टीममध्ये प्रवेश करत भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांनी इतिहास रचला होता. त्या राष्ट्रपतींच्या ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.
थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या ADC पदी नियुक्ती करण्यात आलेल्या मेजर नव्या शेखावत या भारतीय लष्करातील महिला आणि देशातील विद्यार्थिनी, युवती यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.