Shivangi Singh : शिवांगी सिंह यांचा ‘तो’ फोटो का होतोय तुफान व्हायरल? पाकिस्तानला जोरदार चपराक

Rajanand More

शिवांगी सिंह

भारतीय हवाई दलातील स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियात त्यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Shivangi Singh | Sarkarnama

हा आहे फोटो

शिवांगी यांचा हाच तो फोटो. या फोटोमध्ये त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसत आहेत. राष्ट्रपतींनी बुधवारी (ता. 29) राफेल लढाऊ विमानाची सफर केली. यावेळी शिवांगी सोबत होत्या.

Shivangi Singh with President Droupadi Mumrmu | Sarkarnama

का व्हायरल?

फोटो व्हायरल होण्यामागे मोठं कारण आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने शिवांगी यांच्याविषयी काही खोटे दावे केले होते.

Shivangi Singh | Sarkarnama

विमान पाडले

पाकिस्तानमधील सोशल मीडियामध्ये शिवांगी सिंह यांचे विमान पाडल्याचे आणि त्यांना अटक केल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. भारताकडून तातडीने हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते.

Shivangi Singh | Sarkarnama

कोण आहेत शिवांगी सिंह?

शिवांगी या राफेलच्या पहिल्या महिला पायलट आहेत. सध्या त्या अंबाला येथील विशिष्ट गोल्डर एरो स्कॉड्रनमध्ये आहेत. मुळच्या उत्तर प्रदेशातील.

Shivangi Singh | Sarkarnama

2017 मध्ये हवाई दलात

2017 मध्ये महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या तुकडीतून भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल. जेड विमानांच्या उड्डाणामध्ये तरबेज.

Shivangi Singh | Sarkarnama

राफेल प्रशिक्षण

तीन वर्षांतच म्हणजे 2020 मध्ये त्यांना राफेल पायलट प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. नुकतेच त्यांना तमिळनाडू येथे क्वालिफाईड फ्लाईंग इंन्स्ट्रक्टर बॅज मिळाला आहे.

Shivangi Singh | Sarkarnama

फोटो खास

राष्ट्रपीत द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतचा शिवांगी यांचा फोटो खास ठरला आहे. भारतीय हवाई दलासाठी हा दिवस अविस्मरणीय आहे.  

President Droupadi Murmu | Sarkarnama

NEXT : UIDAI चा मोठा खुलासा, 'या' कामांसाठी Valid नाही आधार कार्ड

येथे क्लिक करा.