Pradeep Pendhare
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या संसदीय तथा विधिमंडळ कारकीर्द 59 वर्षे पूर्ण झाली असून, ती 'साठी'च्या उंबरठ्यावर येऊन ठेवली आहे.
शरद पवार यांनी 22 फेब्रुवारी 1967 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.
शरद पवार यांच्या संसदीय व विधिमंडळ कारकिर्दीस फेब्रुवारी 2027 मध्ये 60 वर्षे पूर्ण होतील.
यानिमित्ताने 50 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ संसद वा विधिमंडळात प्रतिनिधीत्व केलेले अन्य नेत्यांची चर्चा होऊ लागली आहे.
तमिळनाडूमधील अत्यंत प्रभावी नेते एम. करुणानिधी यांनी लोकप्रतिनिधीपद 60 वर्षांची कारकिर्दी पूर्ण केली आहे.
महाराष्ट्रातील गणपतराव देशमुख यांनी 54 वर्षे विधिमंडळात लोकप्रतिनिधीपदी केले.
केरळमधील ओमान चांडी यांनी विधिमंडळातून 53 वर्षे लोकप्रतिनिधीपदी राहिले.
मध्य प्रदेशमधील भाजप नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संसदीय कारकीर्द 50 वर्षे राहिली.
पहिले दलित उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी देखील संसदीय कारकीर्द 50 वर्षे होती.
पंजाबमधून सरपंच ते मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालणारे प्रकाशसिंह बादल 50 वर्षे लोकप्रतिनिधीपदावर राहिले.